०१ ऑगस्ट - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी

0

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 

 

👉 जन्म : २३ जुलै १८५६ ( रत्नागिरी ) 

👉 मृत्यू : ०१ ऑगस्ट १९२० ( मुंबई ) 


👉 जीवन : 

            टिळकांचे मूळ नाव केशव परंतु नंतर बाळ हेच नाव रूढ झाले. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत व आईचे नाव पार्वतीबाई. १८७१ मध्ये टिळकांचे लग्न बल्लाळ बाळ कुटुंबातील सत्यभामाबाई यांच्याशी झाले. त्यांना तीन मुली आणि तीन मुलगे होते. टिळकांनी १८७२ मध्ये मॅट्रिक पूर्ण केले. १८७९ मध्ये एल.एल.बी. हि पदवी घेतली. टिळक यांच्यावर जेम्स मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर यांचा प्रभाव होता. डेक्कन कॉलेज मध्ये टिळकांची ओळख आगरकरांशी झाली. याच कालावधीत विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्याचे ठरविले. तेव्हा टिळक आणि आगरकर यांनीही त्यांना साथ दिली. ०१ जानेवारी १८८० रोजी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना झाली. तेथे त्यांनी विनावेतन शिक्षक म्हणून काम केलं.

                     १८८१ मधे टिळक आणि आगरकर यांनी आर्यभूषण छापखाना काढला आणि  त्याच वर्षी केसरी (मराठी) आणि मराठा (इंग्रजी) हि दोन वृत्तपत्रे सुरु केली. सुरुवातील आगरकर केसरीचे तर टिळक मराठाचे संपादक होते. नंतर आगरकर यांनी त्यांच्या आणि टिळक यांच्यामध्ये मतभेद झाल्याने केसरीचे संपादक पद सोडले. नंतर दोन्ही वृत्तपत्रांचे संपादक टिळक होते. छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांना इंग्रजांनी छळ करून मारले. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात दिसून आले. टिळकांनी इंग्रजांवर केसरी आणि मराठा मधून अनेक टीकात्मक लेख लिहिले. त्यासाठी त्यांना आणि आगरकरांना चार महिन्याच्या शिक्षेसाठी डोंगरीच्या तुरुंगात जावे लागले. या घटनेवर आगरकरांनी "डोंगरीच्या तुरुंगातील आमचे १०१ दिवस" हा ग्रंथ लिहिला. 


👉 राजकीय कारकीर्द :

                    महात्मा गांधी यांच्या अगोदर टिळक हे सर्वात प्रसिद्ध राजकीय नेते होते. टिळकांना काँग्रेसची मावळ पद्धत नव्हती. १९०७ ला सुरत येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात फूट पडली. त्यामुळे टिळकांनी बिपीनचंद्र  लजपतराय यांच्या सोबतीने "जहाल  गट" तयार केला. सर व्हॅलेंटाईन चिरोल यांच्या इंडियन अनरेस्ट या १९१५ साली प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात टिळकांविरुद्ध बदनामीकारक मजकूर  असल्याने टिळकांनी  लंडनच्या कोर्टात अब्रुनुकसानीची फिर्याद दाखल केली. परंतु निकाल टिळकांच्या विरुद्ध लागला. या प्रकरणामुळे टिळकांना "फादर ऑफ इंडियन अनरेस्ट - भारतीय असंतोषाचे जनक" संबोधले जाऊ लागले.

                     टिळकांनी डॉ. बेझंट यांच्या सोबत १९१६ मध्ये होमरूल लीग महाराष्ट्रात सुरु केली. १९१९ साली मॉंटफोर्ड सुधारणा जाहीर झाल्यावर टिळकांनी केसरी वृत्तपत्रात "जनाब दिल्ली तो बहुत दूर है" हा लेख लिहिला होता. 


👉 टिळकांनी लिहिलेले ग्रंथ : 

  1.  ओरायन 
  2. आर्क्टिक होम इन द वेदाज 
  3. गीतारहस्य ( मंडाले तुरुंगात याचे लेखन केले. ) 

 

                    ०१ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा मृत्यू झाला. 

👉 महात्मा गांधी यांनी लोकमान्य टिळकांविषयी काढलेले उद्गार - आधुनिक भारताचे निर्माता 

👉 जवाहरलाल नेहरू यांनी लोकमान्य टिळकांविषयी काढलेले उद्गार - भारतीय क्रांतीचे जनक 

 

 

 

                                                                       धन्यवाद! 


 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)