डॉ. बाबासाहेब आंबेडकर | Dr. Babasaheb Ambedkar

0

जन्म : १४ एप्रिल १८९१ ( महू, मध्यप्रदेश )

मृत्यू : ०६ डिसेंबर १९५६ ( दिल्ली )


                    हे भारतीय विधीज्ञ, अर्थतज्ञ, समाजसुधारक व राजकीय नेते होते. बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला. त्यांनी जवाहरलाल नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात कायदा व न्यायमंत्री म्हणून काम केले. डॉ. बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

                   डॉ. बाबासाहेब  आंबेडकरांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर. त्यांचे मूळ गाव महाराष्ट्रातील रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील आंबवडे हे आहे. वडिलांचे नाव रामजी होते. ते ब्रिटिश लष्करात सुभेदार होते. बाबासाहेबांच्या आईचे नाव भीमाबाई होते. डॉ. बाबासाहेबांच्या पत्नीचे नाव रमाबाई होते. १९०८ ते १९१२ या काळात मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून त्यांनी बी.ए. केले. यानंतर त्यांनी बडोदा संस्थानात नोकरी केली. तेथील शिष्यवृत्तीच्या आधारे ते जुलै १९१३ मध्ये अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेले. बाबासाहेब गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले यांना आपले गुरु मानत. 

 

👉 कारकीर्द -  

  • जानेवारी १९२० - त्यांनी मूकनाय साप्ताहिक सुरु केले. 
  • ०८ मार्च १९२० - माणगाव ( कोल्हापूर ) येथे बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्यांची परिषद भरली. यावेळी शाहू महाराज पण उपास्थित होते. 
  • मार्च १९२३ - लंडन विद्यापीठाची D.Sc. पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते.
  • २० जुलै १९२४ - बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. 
  • मार्च १९२७ - महाडच्या चवदार तळ्याचा सत्यग्रह केला. 
  • ०३ एप्रिल १९२७ - बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरु केले. 
  • १९३० ते १९३२ - गोलमेज परिषदेसाठी लंडनला गेले.  
  • सप्टेंबर १९३५ - येवला येथे बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडण्याची घोषणा केली. "मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही" हे वाक्य बोलले. 
  • १५ ऑगस्ट १९३६ - स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. 
  • एप्रिल १९४२ - ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. 
  • एप्रिल १९४६ - मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. 
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑगस्ट १९४७ ते ऑक्टोबर १९५१ या काळात कायदा व न्याय मंत्री होते.
  •  एप्रिल १९५२ ते डिसेंबर १९५६ या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते. 
  • डिसेंबर १९५४ मध्ये रंगून येथील जागतिक बैद्ध परिषदेस उपस्थित होते. 
  • १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला. 
  • ०६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू झाला. 

 

 👉 डॉ. बाबासाहेबांनी सुरु केलेली वृत्तपत्रे - 

  •   मूक नायक ( ३१ जानेवारी १९२० )
  •   बहिष्कृत भारत ( ०३ एप्रिल १९२७ ) 
  •   समता ( २९ जुने १९२८ )
  •   जनता ( १९३० )
  •   प्रबुद्ध भारत ( १९५६ )

👉 डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेले ग्रंथ - 




pixabay.com




धन्यवाद ! 
 
 
 
 
 
जॉईन टेलिग्राम चॅनेल -  https://t.me/knowledgebook1999
 
Follow Facebook Page - knowledgebook1999
 
shopping site - 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)