२९ जुलै - जागतिक व्याघ्र दिवस

0
🐯 प्रस्तावना : 
Source: canva.com
                    भारतीय पट्टेरी वाघ जगातील वैशिष्ट्यपूर्ण प्राणी मानला जातो. परंतु, अनिर्बंध शिकार आणि जंगलावरील अतिक्रमणामुळे वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पूर्वीही माणसाने वाघांची शिकार केलीच; शिवाय जंगलावर अतिक्रमण करून त्यांचे घरही नाहीसे केले. त्याचा परिणाम असा झाला कि वाघ मानवी वस्त्यांमध्ये येऊ लागले. हे सगळं होण्यास मानवच कारणीभूत आहे. 

🐯 या दिनाची सुरुवात कशी झाली?
              २०१० साली रशिया मधील  सेंट पिटर्सबर्ग येथे  व्याघ्र परिषद झाली. त्यामध्ये या दिवसाची घोषणा करण्यात आली.  तसेच या परिषदेत  असेही ठरले कि २०२२ पर्यंत प्रत्येक देशाने आपल्या  देशात असलेल्या वाघांची संख्या दुप्पट करण्याचा प्रयत्न करणे. 


🐯 थीम :
                    दरवर्षी हा दिवस "त्यांचे अस्तित्व आमच्या हातात आहे" या घोषणेने किंवा थीम ने साजरा केला जातो. जगभरात वाघांची संख्या वाढवणे आणि त्यांचे संवर्धन करणे हे मुख्य उद्दिष्ट असते. 

🐯 भारतातील व्याघ्र प्रकल्प :
                    या प्रकल्पांची सुरुवात १९७३ मध्ये तेव्हाचे इंदिरा गांधी सरकार ने जिम कॉर्बेट या राष्ट्रीय उद्यानापासून केली. जिम कॉर्बेट हे उद्यान उत्तराखंड मध्ये आहे. देशात  पहिल्यांदा नऊ व्याघ्र प्रकल्प घोषित केले. यामध्ये मेळघाट अभयारण्याचा देखील समावेश होता. महाराष्ट्र राज्यातील हा पहिला व्याघ्र प्रकल्प होता.  या प्रकल्पाचा उद्धेश वाघांचे संरक्षण करणे हा आहे. जगातील एकूण वाघांपैकी ८० % वाघ भारतात आहेत. भारत जगात सर्वाधिक वाघ असलेला देश आहे. २००६ मध्ये भारतात १४११ वाघ होते. २०१० मध्ये १७०० वाघ होते. २०१८ मध्ये वाघांची संख्या २९६७ इतकी वाढली आहे. 

🐯 भारतातील व्याघ्र प्रकल्पांची यादी :
                    भारतात सध्या एकूण ५३ व्याघ्र प्रकल्प आहेत. (२०२१)
भारतातील व्याघ्र प्रकल्पांची यादी बघण्यासाठी येथे क्लीक करा. 


शेती, अतिक्रमण, जंगलतोड, औद्योगिक विकास, मोठे प्रकल्प उभे करण्यासाठी झालेली जंगलतोड यामुळे वाघांचे घर उध्वस्त झाले आहे. प्रदूषणामुळे, जंगल तोडल्याने झालेल्या  हवामान बदलाचा त्रास सुद्धा वाघांना भोगावा लागतो. भारताच्या सुंदरबन भागात वाघांचे प्रमाण जास्त आहे. परंतु, समुद्राची वाढती पातळी मुळेही त्यांचे घर धोक्यात आले आहे. याबद्दल मानवाने गांभीर्याने विचार करायला हवा. वाघांना वाचवण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत. 








                                                                


                                                                          धन्यवाद!

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)