आज जागतिक हॅप्पटिटिस दिवस साजरा केला जात आहे. हिपॅटायटीस हा एक संसर्गजन्य रोग आहे. यामध्ये आपल्या शरीरातील सर्वात मोठा अवयव म्हणजे यकृत यावर सूज येते. या सुजे मुळे रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. अनेकांना याची लागण झालेली समजत नाही. या रोगामुळे जगातील लाखो लोक मरतात. या रोगाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी २८ जुलै रोजी जागतिक हिपॅटायटीस दिवस साजरा केला जातो.
जागतिक हिपॅटायटीस दिवस आता दरवर्षी 100 हून अधिक देशांमध्ये विनामूल्य स्क्रीनिंग, पोस्टर मोहिम, प्रात्यक्षिके, आणि लसीकरण मोहीम यासारख्या कार्यक्रमांद्वारे साजरा केला जातो. दरवर्षी डब्ल्यूएचओ आणि वर्ल्ड हिपॅटायटीस अलायन्स यांच्यातर्फे जगभरातील सर्व घटनांची माहिती देणारा अहवाल प्रकाशित केला जातो.
👉 थीम :
- 2020: Hepatitis Free Future
- 2021: Hepatitis can't wait
- 2022: Bringing Hepatitis Care Closer To You.
👉 हिपॅटायटिस रोगाबद्दल माहिती :
👉 विषाणू :
पाच प्रकारचे विषाणू असतात - A, B, C, D, E विषाणू.
👉 प्रसार :
हिपॅटायटीस A आणि E पाणी व अन्नामार्फत होतात आणि ह्रपॅटिटिस B, C, D हे रक्तामार्फत किंवा लैंगीक प्रजननाद्वारे पसरतात.
👉 अवयव :
हा रोग प्रमुखकरुन यकृताला हानी पोहोचवतो. यकृताला सूज येऊन माणूस मरु शकतो.
👉 लक्षणे :
- त्वचा व डोळे पिवळे पडतात.
- पिवळी लघवी होते.
- मळमळ होणे.
- भूक मंदावणे.
- पोटात दुखणे.
- राखाडी रंगाची मैला होणे.
- थकवा .
👉 हिपॅटायटीस रोगावर केले जाणारे उपचार :
- हिपॅटायटीस A आणि B ला लस उपलब्ध आहे.
- हिपॅटायटीस C आणि E साठी लस उपलब्ध नाही.
- हिपॅटायटीस D ला B ची लस चालते.
- या आजारात रुग्णाला जास्तीत जास्त विश्रांती सांगितले जाते.
- या रोगावर डॉक्टर ने सांगितलेली औषधेच घ्यावी. स्वतः औषधे आणून घेऊ नये.
- रुग्णांनी मद्यपान, धूम्रपान करू नये.
- घरामध्ये, आजूबाजूला स्वच्छता ठेवावी.
- दुसऱ्याच्या स्वच्छता साधनांचा वापर करू नका. जसे कि साबण, कपडे, इ .
- असुरक्षित लैंगिक संबंध टाळावेत. उघड्यावरील पदार्थ, दूषित आहार, शिळे अन्न , कच्चे मांस खाणे टाळावे.
- लसीकरणामुळे हिपॅटायटिस A आणि B होण्यापासून थांबवू शकतो.


